काल
ऑफिस मध्ये लंच नंतर असच का रे दुरावा हे गाणं हळू आवाजात गुणगुणत होते
आणि नेमके ते गाणे मैत्रिणीच्या कानावर पडल आणि ती ही माझी सोबत देऊ लागली
आणि मग काय एका मागून एक आठवणीतील जुनी मराठी गाणी गाऊ लागलो .
सूर तेचि छेडीता गीत उमटले नवे.खरच किती सुरेख शब्द रचना आणि सुमधुर संगीत लाभल होत जुन्या गाण्यांना . कारण तेव्हा गाणी लिहीली किवा संगीत बद्ध केली जायची ती अशा थोर माणसांकडून ज्यांना प्रसिद्धी किवा पैशाचे वेड नव्हते तर गाणं हा त्यांचा आत्मा होता . बापुजींनी गायलेल्या ,संगीताने सजवलेल्या गाण्यांमध्ये आज ही मनाला मंत्रमुग्द करण्याची किमया आहे . सखी मंद झाल्या तारका ,संथ वाहते कृष्णा माई सारख्या अशा किती तरी अजरामर कलाकृती ते सहज करून गेलेत. त्याच ताकदीचे गीतकार लाभले त्या दशकाला . गदिमां सारख्या थोर गीतकारांनी एक वार पंखावरूनी , का रे दुरावा सारखी अर्थमय गाणी लिहून मराठी भाषेला न्याय मिळवून दिला . गाण्यांना खऱ्या अर्थाने दर्जा मिळाला होता . या गीतकारां मध्ये आणखीन एक नाव आवर्जून घ्यावसं वाटत ते म्हणजे सुरेश भटांच उषःकाल होता होता काळ रात्र झाली एक धारदार लेखणी या शब्दातून स्पष्ट जाणवते . तसेच सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, ओठांवर आपसूकच रेंगाळू पाहत.त्याला आपल्या संगीताने गोडवा देणाऱ्या हृदयनाथ मंगेशकरांनी त्या गाण्याला योग्य तो न्याय दिला.
मंगेश पाडगावकरांच अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती हे गाणे ऐकतांना मनाला एक विलक्षण अनुभूती मिळाल्याचे जाणवते . सुधीर फडक्यांनी आपल्या आवाजाने त्या गाण्याला जिवंत केल .

तीच
आजची गाणी म्हणाल तर अर्थाच सामर्थ्य हरवून बसलेली सुरांशी नात तोडून रचली
गेलेली . आयुष्य हे कस एखाद्याला चुलीवरच्या कांद्यापोह्या प्रमाणे वाटू
शकत तर कोंबडी तंगडी का धरून पळेल . शब्दांना न भावनांचा लेप न सुखद
कल्पनांचा स्पर्श . नुसता यमकाचा पोरखेळ पण एका जोडीने या बुडत्या मराठी
गाण्याच्या विश्वाला सावरल ते म्हणजे अजय अतुल यांच्या संगीताने आणि गुरु
ठाकूर यांच्या अंतरातून उमटलेल्या काव्याने . कधी नटरंग साकारला तर त्याच
ताकदीने जोगवा लीलया पेलला . जोगवा च जीव दंगला रंगला असा याला अप्रतिम
शब्दांनी संजय पाटील यांनी चित्रपटाला दर्जेदार गाण दिलं . अशा गाण्यांनी
वाटू लागले कि कदाचित तो गाण्यांचा काळ परत अनुभवता येईल पण सातत्य
राखण गरजेचं आहे .
जुन्या गाण्यांची मोहिनी आज पर्यंत मनाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते कारण ती गाणी रचताना त्यात चराचरातून प्राण ओतले गेले .
हा लेख सुधीर मोघे यांच्या सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू साउली या ओळींनी आटोपता घेते.
ग्रेस यांच एक सुंदर काव्य
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीतेते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायातो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेलास्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे - ग्रेस

No comments:
Post a Comment