Sunday, 1 September 2013

जुनी मराठी गाणी सोन्याच्या खाणी

काल ऑफिस मध्ये  लंच  नंतर असच का रे दुरावा हे गाणं हळू आवाजात गुणगुणत होते  आणि नेमके ते गाणे मैत्रिणीच्या कानावर पडल आणि ती ही माझी सोबत देऊ लागली आणि मग काय एका मागून एक आठवणीतील  जुनी मराठी गाणी गाऊ लागलो .
सूर तेचि छेडीता गीत उमटले नवे.खरच किती सुरेख शब्द रचना आणि सुमधुर संगीत लाभल होत जुन्या गाण्यांना . कारण तेव्हा गाणी लिहीली किवा संगीत बद्ध केली जायची ती  अशा थोर माणसांकडून ज्यांना प्रसिद्धी किवा पैशाचे वेड नव्हते तर गाणं हा त्यांचा आत्मा होता . बापुजींनी गायलेल्या ,संगीताने सजवलेल्या  गाण्यांमध्ये आज ही मनाला मंत्रमुग्द करण्याची किमया आहे . सखी मंद झाल्या तारका ,संथ वाहते कृष्णा माई सारख्या अशा किती तरी अजरामर कलाकृती ते सहज करून गेलेत. त्याच ताकदीचे गीतकार लाभले त्या दशकाला . गदिमां सारख्या  थोर गीतकारांनी एक वार पंखावरूनी , का रे दुरावा सारखी अर्थमय गाणी लिहून मराठी भाषेला न्याय  मिळवून दिला . गाण्यांना खऱ्या अर्थाने दर्जा मिळाला होता . या गीतकारां मध्ये आणखीन एक नाव आवर्जून घ्यावसं वाटत ते म्हणजे सुरेश भटांच उषःकाल होता होता काळ रात्र झाली एक धारदार लेखणी या शब्दातून स्पष्ट जाणवते . तसेच सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,  ओठांवर आपसूकच रेंगाळू पाहत.त्याला आपल्या संगीताने गोडवा देणाऱ्या हृदयनाथ मंगेशकरांनी त्या गाण्याला योग्य तो न्याय दिला.
मंगेश  पाडगावकरांच अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी   जाती  हे गाणे ऐकतांना मनाला एक विलक्षण अनुभूती मिळाल्याचे जाणवते . सुधीर  फडक्यांनी आपल्या आवाजाने त्या गाण्याला जिवंत केल .
तीच आजची गाणी म्हणाल तर अर्थाच सामर्थ्य हरवून बसलेली सुरांशी नात तोडून रचली गेलेली . आयुष्य हे कस एखाद्याला चुलीवरच्या कांद्यापोह्या प्रमाणे वाटू शकत तर कोंबडी तंगडी  का धरून पळेल . शब्दांना  न भावनांचा लेप   न सुखद कल्पनांचा स्पर्श . नुसता यमकाचा  पोरखेळ पण एका जोडीने या बुडत्या मराठी गाण्याच्या विश्वाला सावरल  ते म्हणजे अजय अतुल यांच्या संगीताने आणि गुरु ठाकूर यांच्या अंतरातून  उमटलेल्या काव्याने . कधी नटरंग  साकारला तर त्याच ताकदीने जोगवा लीलया पेलला .  जोगवा च  जीव दंगला रंगला असा याला अप्रतिम शब्दांनी संजय पाटील यांनी   चित्रपटाला दर्जेदार गाण दिलं . अशा गाण्यांनी  वाटू लागले  कि कदाचित तो गाण्यांचा काळ परत अनुभवता येईल  पण सातत्य राखण  गरजेचं  आहे . 
जुन्या गाण्यांची मोहिनी आज पर्यंत  मनाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते कारण ती गाणी रचताना त्यात चराचरातून प्राण ओतले गेले .
हा लेख सुधीर मोघे यांच्या सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू साउली या ओळींनी आटोपता  घेते.


sudhir

ग्रेस यांच एक सुंदर काव्य

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीतेते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायातो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेलास्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे  -  ग्रेस 


Friday, 23 August 2013

विरांची थोरवी

प्रणाम त्या विरांना ज्यांनी वाहिले आपुले  रक्त,
प्रणाम त्या महात्म्यांना जे होते खरे देशभक्त
थोर होते ते बलिदानी ज्यांनी देशासाठी केले आपले प्राण अर्पण,
ज्यांनी आपल्या रक्ताने या मातेला करून तिलक केले आपल्या  आयुष्याचे समर्पण
का करता उगाच निंदा त्यांची ?
लढता आली असती का तुम्हाला  लढाई स्वातंत्र्याची
सावरकरांसारखा भोगू शकला असता का कारावास?
उत्तर नाही आहे  तर कलंक का  लावतात  षंढांनो त्यांच्या नावास?

एक थेंब रक्ताचा तरी या देशासाठी दाखवा वाहुनी,
मगच म्हणा स्वतला थोर त्यांच्याहुंनी

Thursday, 22 August 2013

पहिली भेट



पहिल्यांदा ज्या वाटेवर भेटलेलो तिथे पुन्हा येशील

ही मनात आज आस जागलेली

म्हणून सगळयांच्या नजरा चुकवून

त्या वाटेकडे एकटक डोळे लावून बसलेली

Wednesday, 21 August 2013

मी मुंबई

मी मुंबई , मायबोली माझी मराठी,
पण सज्ज असते नेहमी प्रत्येक जात सामावून घेण्यासाठी
Old_Mumbai_Queens_Road01कित्येक इतिहास माझ्या डोळ्यांनी पहिले,
माझ्या मुकुटासाठी थोर विरांनी आपले प्राण वाहिले
गोर गरीबांनी माझ्या कुशीत प्रेमाचा आसरा शोधला,
मी हि कोणताच विचार न करता मायेचा पदर पसरला
अनाथांची माउली नि गरिबांची सावली उगाच म्हणतात मला,
आज माझंच मराठी लेकरू आसुसल आहे माझ्या प्रेमाला
माझी अवस्था झाली आहे पंख छाटलेल्या पाखरासारखी,
ज्याची लेकरे झाली आहेत त्याच्या मायेसाठी पारखी .

प्रेमाचे धागे

king3प्रयत्न करूनही विसरता येत नाही तुला,
इतका का आपलासा वाटतोस मला
तुझ्या पासून दूर जावसं वाटलं तरी मन तुझ्याकडेच वळत,
जवळ तू नसताना तुझ्या आठवणीतच हे जळत
जरी रागवलास तरी  तुझ्या मिठीतच रडावस वाटत,
तुला नाकारायचं म्हटलं तर तुझ दुख माझ्या डोळ्यात साठत
तुझ्या सोबत घालवलेले ते चार क्षणच पुरेसे वाटतात   आयुष्यभरासाठी,
इतर कुठल्याही सुखा  पेक्षा अनमोल आहेत ते क्षण माझ्यासाठी
आज कळल लोक का म्हणतात अतूट असतात प्रेमाचे धागे
आता फक्त  हीच इच्छा आहे कि माझे प्रत्येक पाऊल असावे तुझ्या पाऊला मागे.

तो

आज ही  मला तो आठवतो
17पहिल्यांदा जेव्हा भेटलेला
थोडासा गोंधळलेला, थोडासा अडखळलेला
चेहरयावर निरागस भाव असलेला
आज ही  मला तो आठवतो
पहिल्यांदा हात धरताना अतिशय घाबरलेला
थोडासा शांत थोडासा बोलण्यासाठी आसुसलेला
हळूच काही बोलून झाल्यावर उत्तरासाठी एकटक माझ्याकडे पाहत राहिलेला
 आज ही  मला तो आठवतो
निशब्द राहूनही नजरेतून सगळ काही सांगून गेलेला.

आठवणी


http://suvarnaloke.files.wordpress.com/2013/06/eklepana.jpg


 मंतरलेल्या त्या आठवणी पुसल्या कशा जातील,
आसव बनून त्या डोळ्यातुन सहज कशा वाहतील
अळवावरच्या थेंबा प्रमाणे मनात त्या साठवुन ठेवावसा वाटतात,
आणि एकांतात मग हळूच काळ्या ढगां सारख्या दाटतात
ह्रिदयात खोल शिरून कधी जखमा करतात,
तर कधी कडक उन्हात मनाला विसावा देणारया सावल्या बनतात
रात्रीच्या रातराणीचा सुगंध मनात पसरवतात,
खोलवर दडलेलं दुख हळुवार त्या विसरवतात
कातरवेळी सुन्न मनाला सख्या बनून आपुलकीने पुसतात,
तर कधी कधी नकळतच आपल्यावर रुसतात
कुणाची साथ जरी नसली तरी सोबत त्यांची असते,
म्हणून दुःखाच्या महासागरात बुडताना उणीव त्यांची भासते.