प्रयत्न करूनही विसरता येत नाही तुला,इतका का आपलासा वाटतोस मला
तुझ्या पासून दूर जावसं वाटलं तरी मन तुझ्याकडेच वळत,
जवळ तू नसताना तुझ्या आठवणीतच हे जळत
जरी रागवलास तरी तुझ्या मिठीतच रडावस वाटत,
तुला नाकारायचं म्हटलं तर तुझ दुख माझ्या डोळ्यात साठत
तुझ्या सोबत घालवलेले ते चार क्षणच पुरेसे वाटतात आयुष्यभरासाठी,
इतर कुठल्याही सुखा पेक्षा अनमोल आहेत ते क्षण माझ्यासाठी
आज कळल लोक का म्हणतात अतूट असतात प्रेमाचे धागे
आता फक्त हीच इच्छा आहे कि माझे प्रत्येक पाऊल असावे तुझ्या पाऊला मागे.
No comments:
Post a Comment