Wednesday, 21 August 2013

करू द्या कि प्रेम त्यांना ही

मंगेश पाडगावकारांच्या प्रेम हे प्रेम असत यांच्या कवितेशी प्रेरीत होऊन मी ही  माझ्या परीने  लिहिले आहे.

prem

उफाळू द्या त्याचं प्रेम गरम चहा सारखं या पावसात,
तुमच आमच काय बिघडल जर एकत्र ते भिजले या दिवसांत
तुम्ही हि प्याला असाल कधीतरी चहा एक कप मधून,
मग त्यांना ही घेऊ द्या कि आनंद त्या प्रेमाचा जो बरसतोय त्या नभातून
कुठ बिघडलं जर ते चालले एका छत्रीतून,
त्यांच ही प्रेम बहरू द्या की घट्ट झालेल्या मैत्रीतून
त्यांना ही खाऊ द्या की भर पावसात भजी गरमागरम,
तुम्ही ही तेच केल मग त्यांना का वाटावी शरम
घेऊ द्या की त्याला ही हातात हात तिचा,
तुमच आमच होणार आहे का काही वजा
घेऊ द्या की त्यांनाही मजा त्या बरसणाऱ्या पावसाची,
तुम्ही ही आनंद घ्या पावसाचा आठवणी काढत त्या दिवसांची

No comments:

Post a Comment